मुंबई : बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लग्नानंतर लगेच आपल्या कामावर परतले आहेत. काही दिवसांपूर्वी हे कपल सुट्टी एन्जॉय करायला गेले होते. त्यानंतर आता नुकतीच कतरिना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे. मात्र, यावेळी कतरिनाचा लूक पाहून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत आहेत. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कतरिना पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. तीने गुलाबी रंगाचा सलवार सूट घातला होता, त्यासोबत तीने सनग्लासेस आणि मास्क देखील घातला होता. कतरिना यावेळी खुप साधी दिसत होती. मात्र, याचदरम्यान तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर कतरिनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. अनेकांनी कमेंट करत पोस्टवर प्रश्नांचा जमाव साठवला आहे. मात्र, ही बातमी खरी आहे का खोटी यावर कतरिनाने अद्यापही काही माहिती दिली नाही.

विकी आणि कतरिना यांनी गेल्यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. बॉलिवूडच्या बिग फॅट वेडिंग्जपैकी हे एक लग्न होतं. या दोघांनीही लग्नाचे विधी खूपच खाजगी आणि इंटिमेट ठेवले होते. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तीच्याकडे ‘फोन भूत’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ सारख्या चित्रपटांचे प्रोजेक्ट्स आहेत.