Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन, कोणत्या शहरातून धावणार ? वाचा सविस्तर

0

Vande Bharat Express : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. रेल्वेचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने प्रवासी नेहमीच रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात.

याशिवाय, रेल्वेचे तिकीट दर देखील खूपच कमी आहेत. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी नेहमीचं रेल्वेला प्राधान्य दिले जाते. भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सुविधाही पुरवत आहे.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि गतिमान व्हावा यासाठी रेल्वेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात.याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

ही ट्रेन आपल्या वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी विशेष ओळखली जात आहे. ही गाडी सर्वप्रथम देशातील नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती.

यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाचा मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे.सध्या स्थितीला देशातील 34 मार्गांवर ही गाडी सुरू असून आगामी वर्षात ही संख्या आणखी वाढणार आहे.

अशातच आता देशात लवकरच 35 वी वंदे भारत गाडी सुरु होणार असे चित्र तयार होत आहे. उत्तर प्रदेश मधील लखनऊ आणि बिहारमधील पटना या दोन शहरा दरम्यान 35 वी गाडी चालवली जाणार आहे.

कसा असेल रूट

ही गाडी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि बिहारचे राजधानी पटणा या दरम्यान चालवली जाणार आहे. या मार्गांवर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. विशेष म्हणजे आता या गाडीचा मार्गही अंतिम करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, लखनऊहून पाटणाकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुलतानपूरमधून जाणार आहे. या ट्रेनबाबत उत्तर रेल्वे लखनौ विभागाकडून मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, ही गाडी कधी सुरू होईल याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रालाही मिळणार भेट

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये महाराष्ट्राला देखील लवकरच आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे सांगितले जात आहे. राज्यातील मुंबई ते जालना या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असे वृत्त नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आले आहे.

याशिवाय पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते अहमदाबाद आणि पुणे ते वडोदरा या मार्गावर देखील ही हायस्पीड ट्रेन चालवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.