Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

मोठी बातमी ! ‘या’ मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचा थेट बेळगावपर्यंत विस्तार होणार, वाचा सविस्तर

0

Vande Bharat Express : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा रंगल्या आहेत. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हेच कारण आहे की देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे.

सर्वप्रथम 2019 मध्ये ही गाडी रुळावर धावली होती. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सर्वप्रथम ही गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला या मार्गावरील रेल्वे प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दाखवला होता.

यामुळे केंद्र शासनाने भारतीय रेल्वेला देशभरातील महत्वाच्या लोहमार्गावर ही गाडी चालवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. यानुसार, भारतीय रेल्वेने आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू केले आहे.

विशेष बाब अशी की, मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू केले जाणार आहे. तसेच सध्या स्थितीला सुरू असलेल्या काही वंदे भारत एक्सप्रेस चा विस्तार करण्याचे देखील नियोजन आहे.

अशातच देशातील एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक मधील बेळगाव ला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.

बेंगलोर येथून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस आता धारवाड मार्गे थेट बेळगाव पर्यंत चालवली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काल 14 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित एका पत्रकार परिषदेत कडाडी यांनी बेळगावला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे सांगितले आहे. या गाडीचे संभाव्य वेळापत्रक देखील समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील संभाव्य वंदे भारत एक्सप्रेस बेंगलोर रेल्वे स्थानकावरून सकाळी पावणे सहा वाजता रवाना होईल आणि दुपारी दिड वाजता बेळगावला पोहोचणार आहे.

तसेच बेळगाव रेल्वे स्थानकावरून ही गाडी दुपारी 2 वाजता रवाना होईल आणि रात्री 10:10 वाजता बेंगलोर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. मात्र ही वंदे भारत ट्रेन केव्हा सुरू होणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

पण या गाडीला लवकरच हिरवा झेंडा दाखवला जाणार असून ही रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख लवकरच रेल्वेच्या माध्यमातून जाहीर केली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.