मुंबई : काही काळापूर्वी मिस युनिव्हर्स हरनाज कौर सिंधू लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मध्ये सामील झाली होती. तिने यावेळीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती शोच्या जज शिल्पा शेट्टी, बादशाह आणि किरण खेर यांच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि बादशाहचे मिस युनिव्हर्सबद्दलचे वागणे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि आता शिल्पा शेट्टी आणि बादशाहला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
हरनाज कौरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मिस युनिव्हर्स ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सेटला भेट देत असल्याचे दिसून येते आणि त्यानंतर ती किरण खेर, शिल्पा शेट्टी आणि बादशाह यांना भेटायला जाते. यादरम्यान ती हात जोडून भेटते पण बादशाह आणि शिल्पा शेट्टीची वागणूक थक्क करणारी आहे. बादशाह मिस युनिव्हर्सकडे पाहतो आणि म्हणतो, ‘कोई तीसरा बंदा आया है चंदीगड से’. तर दुसरीकडे शिल्पाही तिची बहीण शमिता शेट्टीच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारते. दोघांचा हाच दृष्टिकोन पाहून यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.
ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, ‘शिल्पा शेट्टी हरनाज सिंधूला पाहून चेहरा का करत आहे? मत्सर.’ तर दुसर्या यूजरने लिहिले की, ‘कुठे गेली त्यांची शिष्टाई.’ आणखी एकाने लिहिले, ‘त्याच्या चेहऱ्याला काय झाले आहे? त्यांच्याकडे किती बनावट अभिव्यक्ती आहेत?’ अश्या अनेक कमेंट करत नेटकर्यांनी शिल्पा आणि बादशहाला ट्रोल केलं आहे.