मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ची माजी स्पर्धक उर्फी जावेद तीच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत इंटरनेटवर आग लावत असते. पण चक्क यावेळी उर्फीने सोशल मीडियावर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. फोटोतील उर्फीचा बोल्ड लूक पाहून सोशल मीडियावरील नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये उर्फी तिच्या पलंगावर उलटी पडलेली आहे आणि तिने फक्त डेनिम जीन्स घातली आहे. या बोल्ड स्टाइलमध्ये उर्फीचा लूक किलर दिसत आहे. उर्फी जावेदचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उर्फीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळे प्रत्येकजण या फोटोला कमेंट करत असून आगीचे इमोजी पाठवत आहे. याशिवाय एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अल्लाह तुम्हाला माफ करेल.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘लकी कॅमेरामन.’ तर अनेकांनी कमेंट करत हे छायाचित्र काढणारा कॅमेरामन कोण? असा सवालही केला आहे.