UPSC Exams : लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा (Exam) 2023 ची तारीख जाहीर केली गेली आहे. यासाठीच्या परीक्षेचे विषय आणि संहिताही देण्यात आल्या आहेत. जाणून घ्या UPSC ESE 2023 वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि पॅटर्न बद्दल.
या संदर्भात यूपीएससीने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षेद्वारे भारतीय अभियांत्रिकी सेवा म्हणजेच IES मध्ये जाण्याची संधी आहे. UPSC ESE 2023 वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि पॅटर्न बद्दल वाचा.
असा असेल UPSC ESE परीक्षेचा पॅटर्न
UPSC (UPSC Exams) अभियांत्रिकी सेवा परीक्षेत दोन पेपर असतील. पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी अभियोग्यता पेपर असेल. त्याची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. ESE पेपर 1 एकूण 2022 गुणांचा असेल. यासाठी तुम्हाला 2 तास मिळतील.
UPSC द्वारे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, (UPSC ESE 2023)अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स IES परीक्षा रविवार, 19 फेब्रुवारी 2023 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालेल. तर दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे.
UPSC ESE पेपर 2 हा एकूण 300 गुणांचा असेल. आणि प्रश सोडविण्यासाठी एकूण 3 तासांचा वेळ दिला जाईल. UPSC ESE पेपर 2 मध्ये शाखेच्या विशिष्ट विषयांची परीक्षा असेल. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनीअरिंग.. यामुळे ज्या विषयासाठी अर्ज केला गेला आहे त्यासाठी तुम्हाला हजर राहावे लागेल.
ही परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नवली असेल. तर, UPSC ESE प्रीलिम्स उत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा मुख्य परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा भारतीय अभियांत्रिकी सेवा म्हणून ओळखली जाते. येथे IES परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पहा. यासाठी अर्ज घेण्यात आले आहेत. ही अधिसूचना सप्टेंबर 2022 मध्येच जारी करण्यात आली होती.
दरम्यान, अत्यावश्यक पात्रता, परीक्षा केंद्र, आरक्षणाचे नियम यासह परीक्षेबद्दलच्या प्रत्येक माहितीसाठी – UPSC IES 2023 अधिसूचना वर क्लिक करा आणि अधिक माहीत मिळवा.