मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. दरम्यान, आम्हीही आज स्मृती इराणी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या काही खास पोस्टबद्दल सांगणार आहोत. या पोस्टमुळे स्मृती इराणी जरा जास्तच चर्चेत आल्या होत्या. चला तर मंग पाहूया या पोस्ट आहेत कोणत्या.

या खास पोस्टमधील एक पोस्ट स्मृतीने यांनी 21 जून 2019 रोजी केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘मी काल माझ्या मुलीचा सेल्फी डिलीट केला कारण तिच्या वर्गातला एक मूर्ख मुलगा तिला त्रास देत होता. झा हे त्यांचे आडनाव आहे. तो माझ्या मुलीला तिच्या दिसण्याबद्दल टोमणा मारतो आणि त्याच्या वर्गातील मित्रांना तिची चेष्टा करायला सांगते. माझ्या मुलीने मला विनंती केली होती की आई प्लीज त्याला डिलीट करा ते लोक माझी चेष्टा करत आहेत. ती रडायला लागली म्हणून मी तिच्या बोलने ऐकले’

पुढे स्मृती म्हणल्या, ‘मला नंतर कळले की यामुळे गुंडांच्या उत्साहाला चालना मिळेल. तर श्री झा, माझी मुलगी एक उत्कृष्ट क्रीडा व्यक्ती आहे, लिम्का बुक्सची रेकॉर्ड धारक आहे आणि तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. तिने कराटेच्या जागतिक स्पर्धेत दोनदा कांस्यपदकही जिंकले आहे. माझी मुलगी खूप गोड आहे आणि हो खूप सुंदर पण आहे. त्याला दादागिरी करा, पण ती एक सेनानी आहे. ती जोश इराणी आहे आणि मला अभिमान आहे की मी तिची आई आहे.’ असं स्मृती इराणी यांनी चोख भाषेत या मुलाला उत्तर दिले होते.

त्यानंतर स्मृती इराणी यांनी टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नाबाबत केलेली पोस्टही चांगलाच चर्चेत विषय ठरत होती. त्यांनी या पोस्टमध्ये मौनी रॉय आणि तिचा पती सुरज यांचा फोटो शेअर करत दोघांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, त्यांनी यासोबत मौनी आणि त्या गेल्या 17 वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचेही सांगितले होते. या पोस्टला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.

याशिवाय सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही स्मृती इराणी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी जनरल रावतसोबतचा त्यांचा एक फोटो शेअर केला होता. यासोबतच त्यांनी जनरल रावतसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. यावेळी केलेल्या या भावनिक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

त्यांनतर एकवेळी स्मृती यांनी त्यांचा संसदेजवळचा एक फोटो शेअर केला होता. यासोबत ‘जेव्हा हिंमत तुटू लागते, तेव्हा लक्षात ठेवा की मेहनत केल्याशिवाय कोणताही मुकुट मिळत नाही, अंधारात आपले गंतव्यस्थान शोधा, तुमची शेकोटी कधीही प्रकाशाने मोहित होत नाही.’ असं आशयाच कॅप्शन स्मृती यांनी या पोस्टला दिले होते.

या फोटोसोबत स्मृती यांनी आणखी एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्या ऑफिसमध्ये बसलेल्या दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हस्य दिसत आहे. या पोस्टलाही स्मृती यांनी लिहिलेले कॅप्शन खूप खास आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘विनाकारण चांगले व्हा, कारण असताना तर अनेक लोक चांगलं बनत फिरतात’

स्मृती इराणी यांचा मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबतचा फोटोही चांगलाच चर्चेत आला होता. हा फोटो शेअर करताना स्मृती यांनी विनोदी स्वरात लिहिले होते की, ‘मी माझा अभ्यास पूर्ण केलेला नाही, पुढे काय करावे, असा विचार केला.’ पोस्टच्या या कॅप्शनने चाहत्यांचे मन जिंकले होते. अनेकांनी पोस्टवर कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

यानंतर स्मृती इराणी यांची कोरोना काळातील पोस्टही खूप व्हायरल झाली होती. यावेळी त्यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्या एका छोट्या टेबलावर काम करताना दिसत आहेत. अश्या या स्मृती इराणी यांच्या काही खास पोस्ट आहेत की ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. तर मंग यातील कोणती पोस्ट तुम्हाला आवडली हे आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका.