kkr
"Two drug mafias while enjoying IPL"; Aryan-Ananya trolls on social media

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील IPL 2022 च्या 8 व्या सामन्यात, KKR चा मालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, बहीण सुहाना आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांच्यासोबत सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. आर्यन खान स्टँडवर बसून टीमला जोरदार चीअर करताना दिसला, तर सुहाना खानही कोलकात्यासाठी खुलेपणाने चीअर करताना दिसली.

आर्यन खानसोबत अनन्या पांडेला पाहून नेटकरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी नेटकरी आर्यन खान आणि अनन्या पांड्याला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “ड्रग माफिया आज मैदानावर उपस्थित आहेत.’ आणखी एका यूजरने लिहिले की, “दोन ड्रग माफिया आयपीएल एन्जॉय करत आहेत.” तर काहींनी लिहिले की ते आजही ड्रग्ज घेऊन आले आहेत.

काही काळापूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता ज्यामध्ये अनन्या पांडेचे नावही समोर आले होते. आर्यन खान आणि अनन्या पांडेचे व्हॉट्सअॅप चॅट्सही लीक झाले होते, त्यानंतर एनसीबीने दोघांची चौकशी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन आणि अनन्याच्या लीक झालेल्या चॅटमध्ये ते ड्रग्ज खरेदी करण्यावर चर्चा करत होते. असे देखील समोर आले होते.