TVS : (TVS) लवकरच दिवाळी येणार आहे. सणांचे दिवस लक्षात घेता TVS ने आपल्या स्पोर्ट बाईकवर (TVS Sport Bike) जबरदस्त सूट दिली आहे. तुम्ही सुद्धा नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर TVS ची ही ऑफर तुम्हाला फायद्याची ठरू शकते.

दुचाकी उत्पादक TVS Motors कंपनीच्या TVS Sports वर भरघोस सूट (Discount) देत आहे. त्यामुळे तुम्हीही लवकरच नवीन बाईक घेणार असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

तुम्हाला किती सूट मिळत आहे

या बाईकच्या खरेदीवर ग्राहक 8,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. तर त्यावर 2,100 रुपयांची निश्चित सूट मिळू शकते. ही ऑफर राज्यानुसार बदलू शकते. ही सवलत फार कमी काळासाठी लागू आहे.

TVS स्पोर्टचे इंजिन (TVS Sport Bike)

ही बाईक फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले 99.7 cc 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन वापरते, जे 7350 rpm वर 8.1 bhp ची कमाल पॉवर आणि 4500 rpm वर 8.7 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. यात 4-स्पीड, गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 74 किमी धावू शकते. या बाईकचा टॉप स्पीड 91kmph आहे.

TVS स्पोर्टची वैशिष्ट्ये

या बाईकला पुढच्या चाकाला 130 mm ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 110 mm ड्रम दिलेला आहे. तसेच CBS चे वैशिष्ट्य देखील या बाईकमध्ये दिसून आले आहे. यात 10 लिटरची इंधन टाकी आहे.

TVS स्पोर्टचे डायमेंशन

या बाइकचा ग्राउंड क्लीयरन्स 175 मिमी, रुंदी 705 मिमी, लांबी 1950 मिमी आणि उंची 1080 मिमी आहे, तर तिचा व्हीलबेस 1236 मिमी आहे.

TVS स्पोर्ट्सची किंमत

या बाईकच्या किक स्टार्ट अलॉय व्हील व्हेरिएंटची किंमत 64,050 रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि सेल्फ-स्टार्ट बटण व्हेरिएंट 67,543 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.