TVS Apache : (TVS Apache) टू व्हीलर निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने (TVS Motors) आपली सर्वात लोकप्रिय बाईक टीव्हीएस Apache चे दोन नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. Apache RTR 160 (Apache RTR 160) आणि Apache RTR 180 (Apache RTR 180) अश्या या मॉडेल्सची नावे आहेत. जाणून घ्या बाईकचे सर्व फीचर्स.

दुचाकी उत्पादक TVS Motors ने आपली सर्वात लोकप्रिय बाईक Apache दोन नवीन मॉडेल्समध्ये बाजारात आणली आहे. ही दोन नवीन मॉडेल्स Apache RTR 160 आणि Apache RTR 180 आहेत.

दोन्ही मॉडेल्स त्यांच्या सध्याच्या मॉडेलपेक्षा खूप चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहेत. या दोन्ही बाइक्सना पूर्वीपेक्षा चांगली पॉवर मिळते आणि या दोन्ही बाइक्सचे वजनही कमी करण्यात आले आहे.

दोन्ही बाईकची किंमत

नवीन Apache 160 2V च्या ड्रम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.18 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.22 लाख रुपये आहे. त्याच्या ब्लूटूथ सिस्टीम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे. त्याच वेळी, Apache 180 च्या 2V मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे.

Apache RTR 160 आणि 180 चे इंजिन

नवीन Apache RTR 160 मध्ये 160cc सिंगल सिलेंडर, 2-वाल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन आहे जे 8400 rpm वर 15 Bhp पॉवर आणि 7000 rpm वर जास्तीत जास्त 13.9 Nm टॉर्क निर्माण करते. या बाइकला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Apache RTR 180 मध्ये 180cc सिंगल-सिलेंडर, 2-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 17bhp ची कमाल पॉवर आणि 15.5 न्यूटन मीटरचा सर्वाधिक टॉर्क निर्माण करते. या बाइकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये

TVS Apache RTR 160 ड्रम, डिस्क आणि ब्लूटूथ अशा तीन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. या बाइकमध्ये रेस टेलीमेट्री, गियर पोझिशन इंडिकेटर, लॅप टाइमर, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल ब्राइटनेस, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस नोटिफिकेशन्स, क्रॅश अलर्ट असिस्ट यांसारखी 28 वैशिष्ट्ये आहेत.

ब्लू, ग्रे, रेड, ब्लॅक आणि व्हाईट अशा रंगांच्या निवडीमध्ये ही बाइक देण्यात आली आहे. Apache RTR 180 निळ्या आणि काळ्या रंगात ऑफर केली आहे.