tur bajarbhav

Tur Bajarbhav : तूर उत्पादक शेतकरी बांधवांसाठी यंदाचा हंगाम मोठा फायद्याचा सिद्ध होत आहे. यावर्षी तुरीला बाजारात चांगला बाजार भाव मिळत आहे. शिवाय यावर्षी तूर उत्पादनात मोठी घट होणार आहे.

साहजिकच तूर उत्पादनात घट होणार असल्याने बाजारात तुरीची टंचाई जाणवणार आहे, यामुळे मागणीनुसार पुरवठा राहणार नाही परिणामी बाजारात तुरीला चांगला बाजार भाव मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या देशांतर्गत तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे.

दरम्यान यावर्षी हवामान बदलामुळे तूर पिकाला फटका बसला असून लागवडीखाली क्षेत्रात देखील घट झाली आहे. परिणामी तुर उत्पादनात यावर्षी मोठी घट होणार आहे. एका आकडेवारीनुसार यावर्षी तूर लागवडीखालील क्षेत्र जवळपास साडेचार टक्क्यांनी कमी झाले आहे. यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्यात तुर पिकाला मोठा फटका बसला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगाना या राज्यात पावसाच्या लहरीपणामुळे ऐन फुलोऱ्यात असलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे तूर उत्पादनात मोठी घट होणार आहे. खरं पाहता यावर्षी 39 लाख टन एवढा तुरीच उत्पादन होणार असल्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. मात्र यामध्ये मोठी घट होणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

खरं पाहता देशाला 45 लाख टन तुरीची गरज असते मात्र यापेक्षा यावर्षी कमी तूर उत्पादन होणार असल्याने यावर्षी तुरीचे बाजार भाव तेजीत राहणार आहेत. दरम्यान केंद्र सरकारकडून तूर आयात देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. मात्र असे असले तरी तुरीला यावर्षी चांगला बाजार भाव कायम राहणार आहे.

यावर्षी तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव कायम राहणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. निश्चितच या वर्षी तूर उत्पादक शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस आले आहेत.

तूर उत्पादक शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस आले असले तरी देखील पावसाच्या लहरीपणामुळे तुर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे वाढीव दराचा किती शेतकऱ्यांना फायदा होतो हे तर येणारा काळच सांगेल. मात्र यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळत आहे.