Toyota :(Toyota) नवीन गाडी घ्याचा विचार करत असाल तर टोयोटाची ही ऑफर फायद्याची ठरू शकते. टोयोटाच्या Toyota Urban Cruiser (Toyota Urban Cruiser) या कारवर भरघोस सूट मिळणार आहे. जाणून घ्या टोयोटाच्या या जबरदस्त ऑफरबद्दल.

जर तुम्ही लवकरच नवीन कार घेणार असाल तर तुमच्याकडे पैसे वाचवण्याची मोठी संधी आहे. होय! जर तुम्ही नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Toyota Urban Cruiser खरेदी करून मोठी बचत करू शकता.

कारण टोयोटा या कारवर भरघोस डिस्काउंट (Discount) ऑफर देत आहे. ही सवलत ऑफर अत्यंत मर्यादित कालावधीसाठी आहे, त्यामुळे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी उशीर करू नका. या ऑफर अंतर्गत, तुम्ही या वाहनाच्या खरेदीवर रु.70,000 पर्यंत बचत करू शकता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीची ही ऑफर फेस्टिव्ह सीझनची नाही. कंपनीने या कारचे नवीन अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले असून टोयोटाने या कारच्या जुन्या व्हर्जनचे उत्पादन थांबवले आहे. या कारचा स्टॉक संपवण्यासाठी कंपनी ही ऑफर देत आहे.

ही आहे ऑफर

या टोयोटा वाहनाच्या खरेदीवर ग्राहकांना 12,000 रुपयांची रोख सवलत, 24,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. एकूणच, टोयोटा डीलरशिपवर 50,000 ते 70,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

टोयोटाने अर्बन क्रूझर हायरायडर लाँच केले

टोयोटाने आपली बहुप्रतिक्षित मध्यम आकाराची एसयूव्ही अर्बन क्रूझर हायरायडर देशात लॉन्च केली आहे. ही कार स्ट्राँग-हायब्रिड आणि माइल्ड-हायब्रिड AWD व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारची एक्स-किंमत 15.11 लाख ते 18.99 लाख रुपये आहे.