मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या नृत्याच्या कलेने सर्वांचे लक्षवेधून घेत असते. अनेक फोटो, व्हिडिओ ती आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. या पोस्ट प्रचंड व्हायरलही होतात. दरम्यान, नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे मानसी चर्चेत आली आहे.

मानसी नाईकने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मानसी खूपच दमदार अंदाज दाखवत कमेरामध्ये पोज देत आहे. यावेळी तिने देसी लूक करत पांढरी साडी नेसली आहे. मात्र, या फोटोसोबत तिच्या कॅप्शन जोरदार चर्चा होत आहे. कॅप्शनमध्ये मानसीने म्हंटले आहे की, ‘न मैं गिरा, और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे पर लोग मुझे गिराने मे कई बार गिरे…’ अशी पोस्ट मानसीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.