मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा बहुचर्चेत असलेला ‘हिरोपंती 2’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नुकताच चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षक चांगलीच पसंती दर्शवत आहेत.

‘हीरोपंती 2’ हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 3 मिनिटे 20 सेकंदाचा हा ट्रेलर असून यात तारा सुतारियाचा अंदाच खुपच सुंदर दिसत आहे. तसेच, या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात टायगर श्रॉफ बबलूचे पात्र साकारणार असून नवाजुद्दीन सिद्दीकी लैलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दरम्यान, 2014 साली ‘हीरोपंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर ‘हिरोपंती 2’ हा याच चित्रपटाचा सिक्वेल आहे. तसेच, या चित्रपटाव्यतिरिक्त टायगर श्रॉफ ‘गणपत’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.