मुंबई : बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचे मुले अजून चित्रपटात झळकलेले नाहीत. तरी मात्र या स्टार किड्सची सोशल मीडियावर चर्चा एका स्टार्स सारखीच होत असते. यातच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हिचे तर अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. नुकताच आराध्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो आराध्याच्या शाळेतील एका कार्यक्रमाचा आहे.

आराध्या यावेळी सीतेच्या अवतारात दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. त्याचवेळी तिच्यासोबत तिचे काही मित्र-मैत्रिणीही दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोवर नेटकरी कमेंट करत आराध्याची स्तुती करत आहेत. पण सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आराध्याने सीतेची भूमिका केली असून रामाची भूमिका ही आमिरचा मुलगा आझाद राव खानने साकारली आहे. त्यांची ही क्युट जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हा व्हिडीओ आराध्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतील आहे.

आराध्याला तिची आई ऐश्वर्याप्रमाणेच डान्सची आवड आहे. त्यामुळे अनेकदा आराध्याचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. जे चाहत्यांनाही खूप आवडतात.