मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2022 मध्ये विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे आणि त्यांच्या मते यावेळी विजेतेपद मिळविण्याची दिल्लीकडे क्षमता आहे. कारण त्यांच्याकडे विजेते खेळाडू आहेत. असे गावस्कर यांनी म्हंटले आहे. मात्र, दिल्लीने आत्तापर्यंत आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही.
दिल्लीच्या संघाबाबत बोलताना गावस्कर म्हणाले,”ऋषभ पंतचा कर्णधार म्हणून गेल्या मोसमातील अनुभव यावेळी उपयुक्त ठरेल. गेल्या दीड महिन्यापासून तो भारतीय संघाशी संपर्कात आहे आणि त्याचा संघाला फायदा होईल.”
सुनील गावसकर पुढे म्हणाले, “दिल्लीने ज्या प्रकारची टीम निवडली आणि त्यांनी स्वतःला दिलेले पर्याय, ते खरोखरच मजबूत आहेत. यावेळी त्यांच्याकडे ट्रॉफीवर कब्जा करण्याची क्षमता आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे, परंतु अद्याप ट्रॉफी उंचावलेली नाही. अशा परिस्थितीत 72 वर्षीय सुनील गावस्कर यांना वाटते की, यावेळी दिल्ली कॅपिटल्स हा दुष्काळ संपवेल.