सांधेदुखी (Joint pain) हाडांमध्ये उद्भवणारी समस्या आहे. याचा सामना बहुतांश वृद्धांना करावा लागतो. सांधेदुखी झाल्यावर एक किंवा दोन्ही गुडघ्यांना सूज येऊ शकते. सांधेदुखीचे मुख्य लक्षण म्हणजे गुडघेदुखी (Knee pain) आणि कडकपणा. वाढत्या वयाबरोबर हा त्रास आणखी वाढतो. साधारणपणे रुग्णांना दोन प्रकारच्या सांधेदुखीचा सामना करावा लागतो – ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis) आणि संधिवात.
सांधेदुखीच्या समस्येमुळे माणसाला चालताना खूप त्रास सहन करावा लागतो. याशिवाय बसणे, उभे राहण्यास त्रास होतो. असे मानले जाते की, सांधेदुखीच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी चहा (Tea) खूप मदत करतो. जगातील सर्वच देशांमध्ये चहाचा वापर केला जातो.
प्रत्येकाची स्वतःची बनवण्याची पद्धत वेगळी असली तरी चहामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. सांधेदुखी हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशींना हानी पोहोचवू लागते.
त्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये खूप सूज येते, त्यामुळे सांध्यांना वेदना आणि सूज येते. जळजळ दीर्घकाळ राहिल्यास, यामुळे सांधे देखील खराब होतात. गरम असो वा थंड, चहामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि घरी बनवलेल्या चहामध्ये कॅलरी (Calories), सोडियम, प्रिझर्व्हेटिव्ह, स्वीटनर, कार्बोहायड्रेट, प्रथिने किंवा फॅट्स नसतात.
जेव्हा तुम्ही गरम पाण्यात चहाची पाने टाकता तेव्हा चहाचे फायदे सुगंधाद्वारे तुमच्या शरीरात जातात. चहाच्या पानात पॉलीफेनॉल (Polyphenols) आणि अँटीऑक्सिडंट असतात. संधीवाताच्या समस्येपासून आराम देण्यासोबतच चहामध्ये असलेल्या कॅफिनच्या प्रमाणामुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या हृदयाशी संबंधित आजारांपासूनही सुटका मिळू शकते.
चहा प्यायल्याने सांधेदुखीची समस्या बरी होऊ शकते का? यावर आणखी अनेक संशोधने झाली असून, जी बीएमसीमध्ये प्रकाशित झाली आहे. या अभ्यासात, सांधेदुखी असलेल्या 2237 रुग्णांचा डेटा गोळा करण्यात आला. अभ्यासात सर्व लोकांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये अधूनमधून चहा घेणारे लोक आणि जे लोक खूप घेतात.
अभ्यासात असे आढळून आले की, 57.3% लोक अधूनमधून चहा पितात तर 19.7% लोक जास्त प्रमाणात चहा पितात. अधूनमधून चहा पिणाऱ्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात चहाचे सेवन करणाऱ्यांना संधिवाताचा धोका कमी असल्याचेही या अभ्यासात आढळून आले आहे.
अभ्यासाअंती असे सांगण्यात आले की, सांधेदुखीमुळे होणारा त्रास चहाच्या मदतीने कमी करता येतो. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जे लोक दिवसातून 2 कपपेक्षा जास्त चहा पितात त्यांना संधिवात होण्याचा धोका कमी असतो. तर कधी कधी चहाचे सेवन करणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो.
मात्र चहाच्या सेवनाने संधिवाताची समस्या दूर होऊ शकते, असे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. यावर अजूनही चर्चा सुरू आहे.