गेले काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. पण गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.

तर शेतीतील कामांना देखील वेग आला आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या मळणीची कामे शेतात चालू झाली आहे. पण मजुरांची टंचाई मुळे शेतकऱ्यांना कामे उरकून घेण्यास उशीर होत आहे.

तर वेळीची आणि आर्थिक बचत व्हावी म्हणून शेतकऱ्याच कुटुंब उन्हातान्हात राबून यंत्राच्या साह्याने शेतातील कामे उरकून घेण्यासाठी लगबग करताना सर्वत्र दिसून येत आहे.

यंत्राच्या सहाय्याने मळणीची कामे केल्यास धान्याची नासाडीही होत नाही .तर होणारा अधिकचा खर्च देखील टळला जाऊ शकतो.

करडीच्या पिकांची काढणी मळणी सुरू झाली आसून मराठवाड्यातील बहुतांश भागात अगदी 2000 साला पर्यंत उडीद, मुंग, ज्वारी, कापूस, हरभरा आणि करडई हे प्रमुख पिके होती. पण सध्याचे चित्र वेगळे आहे.

उन्हाळी हंगामात करडई ने शेत शिवार बहरून गेलेले आहे.तर काही ठिकाणी पिक हे काढणीसाठी आली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाची परवा न करता शेतकरी शेतात राबताना दिसत आहे.