मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्या आगामी ‘दसवी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

2 मिनिटे 42 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अभिषेक अशिक्षित नेता गंगाराम चौधरीच्या लूकमध्ये दिसत आहे. ट्रेलरमधला त्याचा दमदार लूक आणि संवाद प्रेक्षकांना खूप आवडतं आहे. त्याचवेळी याच्या विरुद्ध यामी गौतम कडक आयपीएस अधिकारी बनलेली दिसत आहे. तसेच ट्रेलरमध्ये निम्रत कौरही दिसत असून ती बिमला देवीच्या व्यक्तिरेखा साकारत आहे.

‘दसवी’ या चित्रपटाचे चित्रीकरण यूपीच्या आग्रा शहरात करण्यात आले आहे. आग्रा कॉलेज, सेंट जॉन्स कॉलेज, बेलंगंज, कोठी मीना बाजार यासह शहरातील अनेक ठिकाणी चित्रपटाची महत्त्वपूर्ण दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, एका दबंग बंदिवान नेत्यापासून शिस्तप्रिय नागरिक बनण्याविषयी ही कथा आहे. हा चित्रपट 7 एप्रिलला OTT प्लॅटफॉर्म Netflix तसेच Jio सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.