mumbai indians
The richest franchise Mumbai Indians built a 13,000 sq m bio-bubble for the players' families

मुंबई : आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने मुंबईत पोहोचल्यानंतर तयारी सुरू केली आहे. IPL ची सर्वात श्रीमंत फ्रेंचाइजी असलेल्या मुंबई इंडियन्सने संपूर्ण ट्रायडेंट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बुक केले आहे. इतकंच नाही तर पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सच्या मालकाने खेळाडूंच्या कुटुंबासाठी 13 हजार चौरस मीटरचा बायो-बबल तयार केला आहे, ज्यामध्ये फक्त खेळाडूंचे कुटुंब आणि कर्मचारीच राहू शकतील.

रिलायन्सच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने IPL 2022 साठी संपूर्ण ट्रायडेंट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बुक केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांच्या भागधारकांपैकी एक असल्याने, त्यांना खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण हॉटेल मिळाले आहे. आयपीएल 2022, प्रोटोकॉलचे उल्लंघन होऊ नये म्हणून, मुंबई फ्रँचायझीने मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये आपल्या खेळाडूंसाठी बायो-बबल तयार केला आहे. हे 13 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. हे खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफसाठी मनोरंजनाची सुविधा म्हणून काम करेल.

येथे, फुटसल मैदान, पिकल बॉल कोर्ट, बॉक्स क्रिकेट, फूट व्हॉलीबॉल, गोल्फ ड्रायव्हिंग रेंज, Mi बॅटलग्राउंड, मिनी गोल्फ, Mi कॅफे आणि एक किड्स झोन देखील असणार आहे.

गेल्या दोन वर्षांत अनेकांनी आव्हानांचा सामना केला आहे, परंतु आम्ही एक कुटुंब आहोत आणि प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदी ठेवणे ही एमआयची प्राथमिकता आणि जबाबदारी असल्याचे सांगत ही उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले आहे.