मुंबई : टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा त्यांच्या रोमॅण्टिक अंदाजामुळे कायम चाहत्यांचे मन जिंकत असतात. दरम्यान, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची यावर्षी सोबतची पहिलीच होळी होती. या पहिल्या होळीला दोघांनी एकदम मस्त असा रोमांस करत होळी साजरी केली आहे. याचे फोटो, व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत.

होळी पार्टीचे हे फोटो करण कुंद्राने शेअर केले आहेत. या सर्व फोटोमध्ये करण-तेजस्वी रंगाने रंगलेले दिसत आहेत. तसेच, सगळ्या फोटोत दोघे एकमेकांसोबत रोमांस करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे फोटो शेअर करताना करणने सुंदर असे कॅप्शन या पोस्टला दिले आहेत. त्यात त्याने लिहिले की, ‘हो, होय, ही मला सगळ्यात पहिला रंग लावण्यास यशस्वी झाली. आमच्या कडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा’.

करण-तेजस्वीचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. दोघाचे नातं असच फुलत राहो अशी प्रार्थना करत चाहते या पोस्टवर कमेंट करत आहेत. दोघांच्याही फोटोंनी लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दरम्यान, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे त्यांचे रोमँटिक क्षण जगत होते जेव्हा ‘बिग बॉस’ स्पर्धक निशांत भट्टही त्यांच्यासोबत दिसत आहे.