मुंबई : बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी लग्नगाठ बांधली. रणबीर-आलियाचे लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार ‘वास्तू’ येथे रणबीरच्या घरी धूमधडाक्यात पार पडले.
लग्नाला कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजकेच सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते, ज्यात दोन्ही कुटुंबांव्यतिरिक्त करण जोहर, अयान मुखर्जी, आकांक्षा रंजन आणि अंबानी कुटुंबाचा समावेश होता. रणबीरची चुलत बहीण करीना कपूर खान पती सैफ आणि दोन्ही मुले तैमूर अली खान आणि जेह यांच्यासोबत लग्नाला आली होती. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Traditional पोशाखात खान कुटूंब खूपच रॉयल दिसत आहे.
करिनाने जेहसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. करीना गुलाबी रंगाच्या साडी आणि दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे, तर जेहने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला आहे. करिनाने शेअर केलेला जेहसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जेह अतिशय गोंडस दिसत आहे. या क्यूट फोटोसोबत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “FRAMED♥️My Heart♥️My Beta♥️” अनेक यूजर्सनी या फोटोला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.