काश्मिरी पंडितांच्या आयुष्यावर बनलेला ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटानंतर आता अशाच एक सत्य घटनेवर आधारीत एक चित्रपट येणार आहे. निर्माते विपुल शाह यांनी हृदयद्रावक आणि सत्यकथेवर आधारित ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बनवत आहेत. विपुल शाहचा हा चित्रपट 32 हजार बेपत्ता झालेल्या मुलींची कथा आहे, ज्या पुन्हा कधीच आपल्या घरी परतल्या नाहीत.

केरळमध्ये हजारो मुली बेपत्ता झाल्या आहेत आणि गेल्या 12 वर्षांत त्या कधीही त्यांच्या घरी परतल्या नाहीत.  ‘द केरळ स्टोरी’चे लेखक सुदिप्ता सेन असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, “अलीकडेच एका अहवालातून समोर आले आहे की, सन 2009 पासून केरळमधील सुमारे 32000 मुलींचे हिंदू आणि ख्रिश्चनमधून इस्लाम धर्मात धर्मांत करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेकc आणि इतर ISIS मध्ये पाठवण्यात आल्या.”

सुदीप्तोने सांगितल्यानुसार, त्याने या चित्रपटापूर्वी या विषयावर खूप संशोधन केले आहे. संशोधनादरम्यान त्याला असेही कळाले की, अपहरण आणि तस्करीच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या काही मुली अफगाणिस्तान आणि सीरियातील तुरुंगात सापडल्या आहेत. यातील बहुतांश मुलींचे ISIS च्या दहशतवाद्यांशी लग्न लावून त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ बनवण्यात आले होते.

‘द कश्मीर फाइल्स’नंतर आता अनेक निर्माते आपल्या चित्रपटातून सत्य लोकांसमोर आणण्याचे धाडस दाखवू लागले आहेत, असे लोक म्हणत आहेत.