दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे.

करोना काळात ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे.

चित्रपटाने बुधवारी १०.३ कोटी रुपयांची कमाई केली. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत २००. १३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाने अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या ‘सुर्यवंशी या चित्रपटाला ही मागे टाकत करोना काळात सर्वाधीक कमाई केली आहे. या चित्रपटामुळे ‘गंगुबाई’, ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे.