मुंबई : सोशल मीडियावर सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अनेक बॉलीवूडचे, मराठी इंडस्ट्रीतले कलाकार या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण चित्रपटाच्या समर्थनार्थ तर, काहीजण चित्रपटाच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, यातच आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, बिग बींनीं दिलेली प्रतिक्रिया चित्रपट विरोधात आहे का समर्थनार्थ? हे चाहत्यांना कळत नाहीये. यामुळे युजर्स आता अमिताभ यांना ट्रोल करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या ‘बेमिसाल’ या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी काश्मिर हा मुघलांचा शोध असल्याचे सांगितले आहे. अनेकांनी ही क्लिप वेगळ्या प्रकारे शेयर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बिग बी यांना ट्रोल करण्यात आले असून त्यावर आता त्यांनी ट्विट करुन आपली बाजु मांडली आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली नसली तरी नेटकऱ्यांनी त्यावरुन वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे.

अमिताभ यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, ‘आम्हाला आता खरं काही कळलं आहे. जे यापूर्वी माहिती नव्हतं.’ या व्टिटवरुन महानायक बच्चन यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, अमिताभ यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय अत्याराबाबत लिहिलं आहे. तर काहींनी त्याविरोधात भूमिका घेतल्याचे सांगितले आहे. ट्विटवर अनेक कमेंट करत युजर्स अमिताभ यांना ट्रोल करताना दिसत आहेत.