मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नुकत्याच चित्रपट संदर्भात दिलेल्या मुलाखतीत विवेक यांनी कश्मीर पंडितांबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले आहे.

या मुलाखतीत चित्रपटाचे दिगर्शक विवेक अग्नीहोत्री म्हणाले, की “जोपर्यंत आपण काश्मिरी पंडितांवर हा अत्याचार झाला हे जोपर्यंत आपण म्हणत राहू तोपर्यंत हे सर्व होत राहील. आपल्याला असं म्हणावं लागेल की, हे भारतीयांसोबत झालं आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला हे म्हणावं लागेल की, माणसांसोबत हे सगळं घडलं होतं असं म्हणावं लागेल.”

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले की, “मला हे आधीच माहिती होतं की, या चित्रपटावरून वाद होतील, माझ्यावर टीका होईल. जेव्हा सत्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे होतंच. सर्व विचार करत होते, हा माणूस काय चित्रपट तयार करेल? आपण राजा आहोत, हा माणूस रंक आहे? आता मला ट्रोल केलं जाईल, माझं चरित्र बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. मात्र या सर्वांना हा प्रश्न पडला पाहिजे की, कश्मिर जी हिंदूंची जमीन आहे तिथे आज हिंदू का नाही?” असा सवालही विवेक अग्निहोत्रींनी उपस्थित केला आहे.