मुंबई : प्रसिध्द कोमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया आता आई-बाबा झाले आहेत. भारतीने रविवारी, 3 एप्रिल रोजी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता भारती सिंह रुग्णालयातून घरी पोहोचली आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर भारती सिंहने पती आणि मुलासोबत स्पॉट झाली आहे.

ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. दोघांनी पापाराझींना जबरदस्त पोज दिल्या आहेत. यावेळी हर्ष लिंबाचियाने आपल्या मुलाला आपल्या मिठीत घेतले आहे. त्याचवेळी भारती सिंह त्याच्यासोबत हसताना दिसत आहे. भारती सिंह तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि त्यांचा मुलगा एकाच फ्रेममध्ये दिसत आहे. तिघांनाही एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

दरम्यान, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. दोघांनी गोव्यात लग्न केले आणि लग्नाचा सोहळा 5 दिवस चालला आणि 3 एप्रिलला या जोडप्याला एक मुलगा झाला आहे.