मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय आणि उद्योजक सुरज नांबियार या दोघांनी काही दिवसांपूर्वी लग्न केले आहे. लग्न झाल्यापासून हे जोडपं आपलं वैवाहिक जीवनाचा आनंद घेत अनेक ठिकाणी सुट्टी एन्जॉय करत आहेत. आता हे जोडपं होळीनंतर सुट्टीसाठी दुबईला रवाना झालं आहे. याचे काही फोटो मौनी रॉयने नुकतेच शेअर केले आहेत. ज्यात ती सूरजसोबत रोमँटीक होताना दिसत आहे.

मौनी रॉयने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसते की, मौनी रॉय सूरज नांबियारसोबत रोमँटिक होत आहे. यातील एका फोटोमध्ये ती सूरजच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सूरज आणि मौनी त्यांच्या मित्रांसोबत मजा करताना पाहायला मिळत आहेत. मौनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

सूरज नांबियार आणि मौनी रॉय 27 जानेवारी 2022ला विवाहबद्ध झाले. दोघांचे लग्न आणि लग्नाआधीचे विधी खूप व्हायरल झाले होते. कोरोनामुळे लग्नाला फारच कमी लोक उपस्थित होते. मात्र, नंतर या जोडप्याने जवळच्या लोकांना रिसेप्शन दिले होते. या सर्व कार्यक्रमात मौनीच्या लुकने सर्वांचे लक्ष फक्त तिच्याकडेच आकर्षित करून घेतले होते.