व्हिस्कीच्या जगात भारताच्या ब्रँडसचा दबदबा ! वर्षभरात विकल्या गेल्या करोडो बॉटल, पहा दर
त्यामुळे भारतात तयार झालेल्या व्हिस्कीच्या लाखो बाटल्या वर्षभरात विकल्या गेल्या. 18 अब्ज डॉलरच्या भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये देशी ब्रँड वेगाने वाढत आहेत आणि परदेशी ब्रँड्सशी स्पर्धा करत आहेत.
दारूच्या बाबतीत भारताने जगभरातील परदेशी ब्रँड्सना मागे टाकले आहे. एकेकाळी जगात व्हिस्कीच्या बाजारपेठेत परदेशी ब्रँडचा दबदबा होता, तिथे आता लोकांना मेड इन इंडिया व्हिस्की आवडायला लागली आहे.
त्यामुळे भारतात तयार झालेल्या व्हिस्कीच्या लाखो बाटल्या वर्षभरात विकल्या गेल्या. 18 अब्ज डॉलरच्या भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये देशी ब्रँड वेगाने वाढत आहेत आणि परदेशी ब्रँड्सशी स्पर्धा करत आहेत. 15 वर्षांपूर्वी जागतिक बाजारात व्हिस्कीचे केवळ 2-3 भारतीय ब्रँड उपलब्ध होते.
पण आता हा ट्रेंड बदलला आहे. आता 30 भारतीय व्हिस्कींनी जगातील लिकर मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये इंडियन सिंगल माल्ट ब्रँड आणि स्कॉच ब्रँड यांच्यात कडवी स्पर्धा होती. या कालावधीत भारतीय सिंगल माल्ट ब्रँडची विक्री 2.4 टक्क्यांनी वाढून 2,81,000 झाली, तर स्कॉच ब्रँडची विक्री 35 टक्क्यांनी वाढून 2,96,000 झाली.
* Glenlivet ला मागे टाकून ‘हे’ बनले टॉप ब्रँड
Single Malt Amateur Club चे संस्थापक हेमंत राव यांच्या म्हणण्यानुसार, 15 वर्षांपूर्वी भारतीय व्हिस्की विदेशी व्हिस्की बाजारात मोलॅसिस म्हणून नाकारण्यात आली होती. 2013-14 या वर्षात भारतीय बनावटीच्या फक्त दोन-तीन व्हिस्की मार्केटमध्ये होत्या.
आता हीच संख्या थेट 30 वर पोहोचलीये. मागील वर्षभरात भारतीय सिंगल माल्ट्समध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. 2022 च्या विक्रीचे आकडे पाहिले तर amrut चे दोन ब्रँड टॉप 2 मध्ये आहेत.
भारतात बनवलेल्या amrut व्हिस्कीने जगप्रसिद्ध स्कॉटिश ब्रँड Glenlivet ला मागे टाकले आहे. विक्रीच्या बाबतीत Paul John दुसऱ्या स्थानावर आहे. Amrut Fusion ची विक्री 99,000 केस होती आणि Amrut Amalgamची विक्री 94,000 केस होती.
* Amrut ची किंमत किती आहे ?
जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या Amrut fusion Whiskyची किंमत भारतात 5200 रुपये आहे. अमृत फ्यूजनला 2011 मध्ये लंडनमधील स्पिरिट्स बिझनेस अवॉर्ड्समध्ये ग्रँड मास्टर ऑफ वर्ल्ड व्हिस्की म्हणून गौरविण्यात आले होते. 2011 मध्ये रॉब रॉयला अल्टिमेट कॉकटेल चॅलेंजमध्ये बेस्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. विक्रीच्या बाबतीत त्याने Glenlivet ला मागे टाकले आहे.
* येथे तयार केले जातात भारतीय ब्रँड
भारतात GianChand ब्रँडची व्हिस्की आहे जिची प्रोडक्शन जम्मूमध्ये केले जाते. त्याचप्रमाणे Radico Khaitan चा प्लांट यूपीच्या रामपूर जिल्ह्यात आहे. Piccadily हरियाणात आणि राजस्थानमधील अलवरमध्ये Diageo बनवली जाते.