मुंबई : ‘बिग बॉस 15’मधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत पाहायला मिळते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याचे दिसते. वेगवेगळे व्हिडिओ, फोटो शेअर करत चाहत्यांच्या कायम संपर्कात राहायला तेजस्वीला आवडते. असेच काहीसे कातीलाना फोटो घेऊन तेजस्वी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. हे फ़ोटो पाहून तुमचे होश उडल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. तर मंग पहा फोटो.
तेजस्वी प्रकाशने तिचे काही नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच, यावेळी फोटोंमध्ये तेजस्वीने दिलेल्या पोझ पाहून चाहते घायाळच झाले आहेत. तिच्या फोटोतील अदा चाहत्यांच्या मनाला भिडत आहेत.
दरम्यान, तेजस्वी सध्या करण कुंद्रासोबतच्या तिच्या नात्यामुळेही चर्चेत असते. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस 15’च्या घरात झाली होती. तिथे दोघेही आधी एकमेकांचे मित्र बनले होते, त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि शो संपून झाला असला तरी हे कपल एकत्र आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना स्पॉट होतात. दोघांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांना ही खुप आवडते.