alia and ranveer
The beginning of a new journey ... Special wishes from superhero Amitabh Bachchan to Ranbir and Alia!

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काल म्हणजेच 13 एप्रिलला रणबीर आणि आलिया यांची हळदी सेरेमनी होता. लग्न 14 एप्रिल म्हणजेच आज आहे. या खास प्रसंगी जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. हळदी समारंभात रणबीरची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर, पूजा भट्ट, अयान मुखर्जी, महेश भट्ट, करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

दरम्यान, रणबीर आणि आलियाला बी-टाउन सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचे मेसेजही येऊ लागले आहेत. यातच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या जोडीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील ‘केसरिया’ या रोमँटिक गाण्याचा टीझर अमिताभ यांनी शेअर केला आहे. या गाण्यासोबतच अमिताभ बच्चन यांनी एक कॅप्शनही लिहिलं आहे, “आमची ईशा आणि शिव लवकरच एक खास प्रवास सुरू करणार आहेत, दोघांना खूप प्रेम.”

रणबीर आणि आलियाचे लग्न डिसेंबर 2020 मध्येच होणार होते, परंतु देशभरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे ते पुढे ढकलण्यात आले. रणबीरने स्वत: एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, जर कोरोना नसता तर त्याने आलियाशी लग्न केले असते.