Thank God : (Thank God) जबरदस्त डान्स आणि मनमोहक अदांनी नोरा (Nora Fatehi) कायम चाहत्यांची मने जिंकते. लवकरच ती थँक गॉड या सिनेमात एक आयटम सॉन्ग करताना पाहायला मिळणार आहे. या गाण्यात सिद्धार्त मल्होत्रासुद्धा तिच्यासोबत दिसणार आहे. पहा या गाण्याचा टीजर.

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​यांचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ खूप चर्चेत आहे. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्मात्यांनी त्याच्या पहिल्या गाण्याचा ‘मणिके’चा टीझरही रिलीज केला आहे.

हे एक आयटम साँग आहे, ज्यामध्ये नोरा फतेही तिच्या मस्त डान्स मूव्ह्सने सिद्धार्थचे होश उडवताना दिसणार आहे. त्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे.

इंस्टाग्रामवर ‘मणिके’चा(Manike) टीझर शेअर करताना नोराने असेही सांगितले की, संपूर्ण गाणे 16 सप्टेंबरला येणार आहे आणि हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. टीझरमध्ये, नोरा आणि सिद्धार्थ पांढर्‍या रंगाच्या ऑऊटफिटमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यातील सिझलिंग केमिस्ट्री देखील स्पष्टपणे दिसत आहे.

अजय देवगण (Ajay Devgan) पार्श्वभूमीत एक डायलॉग मारतानाही ऐकू येत आहे. सिद्धार्थला उद्देशून तो म्हणतो, “एक प्रकारची दुर्बलता जी फक्त तुझ्यातच नाही तर प्रत्येक माणसामध्ये आहे.. लस्ट, वासना, काम.”

श्रीलंकन ​​गायक योहानी आणि जुबिन नौटियाल यांनी ‘माणिके’ला आपला आवाज दिला आहे. गेल्या वर्षीच्या व्हायरल झालेल्या ‘माणिका माझे हिते’ या गाण्याचे हे रिक्रिएट व्हर्जन आहे.

अजय, सिद्धार्थ आणि नोरा फतेही व्यतिरिक्त इंद्र कुमारच्या ‘थँक गॉड’मध्ये रकुल प्रीत सिंह देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ती एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जिचा पती सिद्धार्थ बनला आहे आणि त्याला आपल्या पत्नीचा हेवा वाटतो.

चित्रपटात यमराज आणि चित्रगुप्त आधुनिक शैलीत मांडण्यात आले असून कथा खूपच मजेदार आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. त्याची सुरुवात सिद्धार्थच्या अपघाताने होते आणि तो थेट यमलोकात पोहोचतो.

तिथे तो चित्रगुप्ता म्हणजेच अजय ला भेटतो, जो पापांचा लेखाजोखा मांडतो आणि त्यानंतर चित्रपटात पुढे काय होते हे पाहण्यासाठी त्याला रिलीजची वाट पाहावी लागेल. ‘थँक गॉड’ दिवाळीच्या मुहूर्तावर येत असून अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ या चित्रपटालाही तगडी स्पर्धा मिळणार आहे.