मुंबई : आपल्या मनमोहक परफॉर्मन्सने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या प्रिया प्रकाश वारियरबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे. मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फोटो शेअर करून देशातच नाही तर जगभरातल्या लाखो लोकांचे लक्ष वेधून घेते. ही अभिनेत्री कधी इंस्टाग्रामवर तिचा बोल्ड अवतार दाखवते, कधी पारंपारिक, तर कधी गाणी गाऊन चाहत्यांचे मनोरंजन करते. पण यावेळी अभिनेत्रीने लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळे केले आहे. यावेळी अभिनेत्रीने शेअर केलेला लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
अलीकडेच प्रिया प्रकाशने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात अतिशय वेगळी दिसत आहे. तिचा हा नवा अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
या गेटअपमध्ये अभिनेत्रीने लोकांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या, परंतु तिचे फॉलोअर्स तिच्या या लूकमागील कारण जाणून घेण्यास उत्सुक आहेत. फोटो बघून प्रत्येकजण विचारत आहे, ‘काय झालं अचानक’…’ दु:खी का आहेस…’
प्रिया प्रकाश याआधी कधीच अशा लूकमध्ये दिसली नव्हती. तिने नेहमीच तिच्या गोंडस स्मित आणि कुरळे केसांनी अनेकांना आकर्षित केले आहे, परंतु यावेळी तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा दिसत आहे. मात्र, अनेकजण तिच्या फॅशनला अनोखे म्हणत आहेत, तर अनेकजण तिची खिल्लीही उडवत आहेत.
प्रिया प्रकाशवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो, मात्र यावेळी चाहत्यांनी तिला पाहून धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियाच्या या नवीन लूक मागचे कारण म्हणजे ती एका ब्रँडचे प्रमोशन करत आहे.