Team India's veteran cricketer Vinu Mankad's son dies, 4 times was part of the champion team

नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू विनू मांकड यांचा मुलगा मुंबईचा माजी फलंदाज राहुल मांकड याचे बुधवारी आजारपणामुळे लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने अवघ्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राहुलच्या मृत्यूच्या वृत्ताला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) ट्विटरवरून दुजोरा दिला आहे.

एमसीएने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार विनू मांकड यांचा मुलगा राहुल मांकड यांच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,”

विनूच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या राहुलने 1972-73 आणि 1984-85 दरम्यान 47 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि पाच शतके आणि 12 अर्धशतकांसह 2,111 धावा केल्या. त्यांचे भाऊ अशोक आणि अतुल हे देखील क्रिकेटपटू होते. अशोकने भारताचे प्रतिनिधित्व केले तर अतुलने देशांतर्गत क्रिकेट खेळले. चार वेळा मुंबईच्या रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य असण्याव्यतिरिक्त, राहुल 1978-79 मध्ये दलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीचा भाग होता.