मुंबई : बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत तिच्या अतरंगी स्टाईलमुळे कायम चर्चेत पाहायला मिळते. राखी प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान, राखीचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमधील राखीचा लूक पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. कारण या लूकमध्ये राखी चक्क अंगाला भांडी लावताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये राखी सावंतने अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंपाकघरातील भांडी बांधली आहेत. तीच्या डोक्यावर कढई आहे, तर हातात दोन झाऱ्या आहे. तसेच, तीच्या कमरेला ग्रिडर आणि छातीवर दोन डब्बे बांधलेले आहेत. राखीच्या या लुकने लोकांचे हसू थांबता थांबत नाहीये.
हा व्हिडिओ सुरू होताच राखी सावंत म्हणते की, आज तुम्हाला मी बेले डान्स शिकवते. यानंतर ती अंगावर बांधलेली भांडी हातातील झाऱ्याने वाजऊ लागते. हा व्हिडिओ बनवताना राखी सुद्धा असताना दिसत आहे. ती पण तिच्या या वेडेपणाचा आनंद घेत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओच्या शेवटी राखी तिच्या मागेही भांडे लटकावले असल्याचे दाखवते. राखीचा हा फनी व्हिडिओ voompla नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर लोक कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.