surykumar yadav
Suryakumar Yadav out of IPL first match?

नवी दिल्ली : आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. पण, या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या खेळावर सस्पेंस आहे. तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकत नसल्याचे वृत्त आहे. सूर्यकुमार मुंबईच्या मधल्या फळीतील दमदार फलंदाज आहे. अशा परिस्थितीत त्याचे न खेळणे संघासाठी अडचणी निर्माण करू शकते. तेही जेव्हा स्पर्धेचा पहिला सामना असेल आणि प्रत्येक संघ विजयाने सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार असेल.

सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात न खेळण्याचे कारण त्याची दुखापत असल्याचे मानले जात आहे, त्यामुळे त्याला बरे होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. खरं तर, भारतीय फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता, आता त्याला आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यातही खेळणे कठीण जात आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादवला अंगठ्याच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे तो आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. IPL 2022 चा पहिला सामना 27 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरूमध्ये उपचार घेत आहे. दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर आहे. पण तो आयपीएल 2022 चा पहिला सामना खेळेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. बोर्डाचे वैद्यकीय कर्मचारी त्याला स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यापासून दूर राहण्यास सांगण्याची शक्यता आहे.