मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभास लवकरच आगामी चित्रपट ‘सालार’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन आणि जगपती बाबू देखील दिसणार आहेत. सध्या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे शुटिंग आता बंद करण्यात आले आहे. नेमकं कशामुळे चित्रपटाचे शुटींग बंद करण्यात आले आहे? चला आपण पाहू.

साऊथचा सुपरस्टार प्रभासची नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘राधे श्याम’ या चित्रपटानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, हे तुम्हाला माहीत असेलच. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी तो परदेशात गेला होता. यानंतर, जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने ‘सालार’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली.

मात्र, शूटिंगदरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला. आता मिळालेल्या माहितीनुसार, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे की, प्रभासला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी दोन महिने लागतील. याच कारणामुळे निर्मात्यांनी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, प्रभासच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘प्रोजेक्ट के’टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो बॉलिवूडच्या मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. यासोबतच तो ‘आदिपुरुष’मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत सैफ अली खान आणि क्रिती सेनन झळकणार आहेत.