मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याचा ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, अल्लू अर्जनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आली आहे. अल्लू अर्जन नुकताच बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आफिसला भेट देताना दिसला आहे. यामुळे भन्साली आणि अल्लूअर्जनची जोडी लवकरच एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतील असे म्हंटले जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, अल्लूअर्जन आधी मुंबईतील प्रायव्हेट एअरपोर्टवर पाहिला गेला आणि तिथनं त्यानं थेट ‘गंगूबाई काठियावाडी’ दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचं ऑफिस गाठलेलं. यावेळी त्याने काळ्या रंगाच्या पेहरावात, डोळ्यावर स्मार्ट गॉगल लावलेला लूक करी केला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘पुष्पा’ सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमानिमित्तानं अल्लूनं हिंदी भाषा बोलायच्या केलेल्या प्रयत्नाने चाहत्यांची मनं जिंकली होती. तेव्हाच अल्लूअर्जननं बॉलीवूडमधील आपल्या एन्ट्रीची नकळत कल्पना दिली होती. आता अचानक संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये त्यानं दिलेल्या व्हिझिटमुळे तो लवकरच बॉलीवूड प्रोजेक्ट करणार अशी चर्चा जोरदार रंगलीय. त्याचे चाहतेही अल्लूअर्जनच्या बॉलीवूडमध्ये होणाऱ्या पदर्पणावर आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, यावर अद्यापही कोणाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.