मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या उत्तराखंडची पवित्र भूमी ऋषिकेशमध्ये पोहोचले आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहेत. शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे जाऊन पूजा आणि आरती केली. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
अलीकडेच, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये पोहोचले होते, ते ऋषिकेशला गेले आणि स्वामी चिदानंद यांच्यासोबत घाटावर प्रार्थना करताना दिसले. सुपरस्टारने केलेल्या या पूजा आणि आरतीचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
महानायक अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. झुंड हा चित्रपट रिऍलिस्टिक स्टोरीवर आधारित आहे. या चित्रपटातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला असून वयाच्या या टप्प्यावर येऊनही त्यांच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. जे एक एक करून रिलीजसाठी तयार आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्टसोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि अजय देवगणचा ‘रनवे 34’ हे त्यांचे आगामी चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत.