मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. तीने मुंबईत तीच्या स्वप्नातील घर घेतले आहे. तीने यासाठी दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये केलेला संघर्ष आपण पहिला आहे. आज सनीला तीच्या घरातुन तीचा हा संघर्ष सार्थक झाल्याचे दिसत आहे. या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सनी लिओनी हिने गेल्यावर्षीच तिचा पती डॅनियल वीबर याच्यासह हे घर विकत घेतलं आहे. मुलांना एक व्यवस्थित बेस मिळावा, याकरता घर खरेदी केल्याचं सनी सांगते. बॉलिवूमध्ये गेल्या एका दशकापासून असणारी सनी आतापर्यंत मुंबईत एका भाड्याच्या घरात राहत होती, आता तिने स्वत:चं असं स्वप्नातलं घर खरेदी केल आहे. सनी लिओनीने खरेदी केलेल्या या मुंबईतील 3 बेडरुम पेंट हाऊसची किंमत जवळपास 16 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईत घर घेण्याबाबत सनी म्हणाली की, ‘याठिकाणी घर घेण्याचा आमचा निर्णय इमोशनल होता. भारत देश आमचे प्राथमिक घर आहे ज्याठिकाणी आम्ही सर्वाधिक वेळ व्यथित केला आहे. आमची तीन मुलं आहेत आणि आम्हाला असे वाटले की केवळ एका अपार्टमेंटमधून दुसरीकडे शिफ्ट होताना आम्ही त्यांना व्यवस्थित स्थेर्य नाही देत आहोत. आम्ही आमच्या मुलांना अशी स्पेस देऊ इच्छितो, ज्यावर ते प्रेम करतील. जर तुम्ही आमच्या घरात येऊन पाहिलं तर तुम्हाला समजेल की हे घर अमेकिकन शैलीत बनले आहे.’

सनी पुढे म्हणाली की, ‘आता वेळ आली होती की आम्ही काही गोष्टी कायमस्वरूपी कराव्यात. माझी मुले देखील यावेळी आणि या नवीन घराचा खूप आनंद घेत आहेत. कारण त्यांना त्यांच्या बाइक चालवण्यासाठी आणि बागेत खेळण्यासाठी पुरेशी जागा मिळत आहे. स्विमिंग पूलसह इतर अनेक सुविधांवर काम सुरू आहे. हे एक फूल सर्व्हिस अपार्टमेंट आहे. यात मला माझ्या मुलांसाठी चिंतित राहण्याची आवश्यकता नाही.’ असे सनी म्हणाली.