यंदा धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूलाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेली 3 ते 4 वर्ष पाण्याअभावी सूर्यफुलाच्या लागवडीचे प्रमाणही कमी झाले होते.

या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाणी मुबलक प्रमाणात आसल्या मुळे ह्यावर्षी सूर्यफूलाची लागवड मोठ्या करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी परिसरात यंदा सूर्यफूल पिके बहरली आहेत.रब्बी पिकासाठी पाणी हे मुबलक प्रमाणात असणे गरजेचे असते.

पण गेली 3 ते 4 वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफूल लागवड करणे टाळले होते. या वर्षी पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आसल्या मुळे रब्बी हंगाम सूर्यफूल लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

रब्बी हंगामातील वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक म्हणून ओळखले जाते.

सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात घेता येणारे पीक आहे.ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळतात.

सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. ह्या पीकांचे उत्पादन कमी कालावधीत घेता येते.

सुर्यफुलाचे उत्पादकता वाढविण्यासाठी संकरित वाणांची निवड करून शेतकरी अधिकचे उत्पादन घेऊ नफा मिळवू शकतो