मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. शो वेगवेगळ्या वादात असतानाच शोची एक महत्त्वाची व्यक्तिरेखा सुमोना चक्रवर्ती शो सोडत असल्याच्या बातम्या येत आहेत. माहितीनुसार, सुमोना लवकरच एक बांगला शो होस्ट करणार आहे आणि यामुळे तिने कपिलच्या शोपासून स्वतःला दूर केले आहे असे म्हंटले जात होते. पण आता सुमोनाने यावर खरे काय हे स्वतः समोर येऊन सांगितले आहे.

सुमोनाने सांगितले की तिने कपिलची साथ सोडली नाही आणि ती बारबार शोचा भाग असेल. एका मुलाखतीत सुमोना म्हंटली की, तिने हा शो सोडलेला नाही आणि भविष्यातही तिला हा शो सोडायचा नाही. तिच्या नवीन शोबद्दल ती म्हणाला की ‘शोनार बांगला’ हा फक्त एक महिन्याचा शो आहे. ही दहा भागांची मालिका असून जीझेस्ट नावाच्या वाहिनीवर ती दाखवली जाणार आहे. तिला प्रवासाची खूप आवड आहे, त्यामुळे ती हा शो करत आहे. असं सुमोना म्हणाली. तसेच, सुमोनाने ती कपिल शर्मा शो सोडणार नसल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, सुमोना चक्रवर्तीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती फक्त कपिल शर्मा शोमध्येच नाही तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘काश्मीर’ आणि ‘एक थी नायक’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही दिसली आहे.