लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात घटस्फोट घेणाऱ्यांना सुधा मूर्तींचे खडेबोल ! दिला सुखी संसाराचा कानमंत्र, काय म्हटल्या मूर्ती ?
Sudha Murthy On Divorce : भारतीय संस्कृतीत विशेषता हिंदू सनातन धर्मात विवाह हा एक पवित्र संस्कार समजला जातो. हिंदू धर्मामध्ये विवाह हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असतो. सनातन धर्मात विवाह हा पंधरावा संस्कार असतो. या संस्काराअंतर्गत उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांच्या साक्षीने पती-पत्नी म्हणून संबद्ध होतात. विशेष म्हणजे हिंदू धर्मात इतर धर्माप्रमाणे करारबद्ध लग्न होत नसतात. म्हणजेच हिंदू धर्मातील विवाह तोडले जाऊ शकत नाहीत.
एकदा लग्नाची गाठ बांधली की सात जन्मापर्यंत पती-पत्नीचे संबंध राहतात अशी धारणा हिंदू धर्मात पाहायला मिळते. मात्र प्रत्येक धर्म आणि देश काळाच्या ओघात बदलतो. हिंदू सनातन धर्मात देखील काळाच्या ओघात काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत देखील काळाच्या ओघात मोठे बदल झाले आहेत आणि आता पाश्चात्य देशांच्या संस्कृतीचा आपल्या भारतीय संस्कृतीवर पगडा पाहायला मिळत आहे.
याचा परिणाम म्हणून देशात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घटस्फोट होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सिनेसृष्टीमध्ये तर या घटना कॉमन आहेत. मात्र अलीकडे सर्वसामान्यांमध्ये देखील या घटना वाढत आहेत. एकेकाळी सात जन्मांसाठी बांधलेली ही जन्मगाठ आता सहा महिने देखील टिकत नाही यामुळे काहीशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे. समाजात अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये लग्न होऊन फक्त सहा महिन्यांचा काळ उलटतो किंवा एका वर्षाचा काळ उलटतो तोवर घटस्फोट होऊन जातो.
यामुळे सात जन्मांसाठी बांधलेली ही लगीनगाठ काही महिन्यांच्या काळात का तुटते हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. भारतीय संस्कृतीत या 21व्या शतकात असा काय बदल घडला की एकेकाळी वर्षानुवर्ष सदृढ राहणारे पती-पत्नीचे संबंध आता काही महिन्यातच खराब होऊ लागले आहेत या प्रश्नाचा मागोवा घेणे देखील जरुरीचे बनले आहे. खरंतर पती-पत्नीच्या गोड मधुर नात्यात लहान-सहान भांडणे होणे हे प्रेमाचे प्रतीक समजले पाहिजे. मात्र अलीकडे हे भांडणे घटस्फोटापर्यंत घेऊन जात आहेत. या घटनेत कोरोनानंतर मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
सततचे वाद, वैचारिक मतभेद आणि संवादाचा अभाव यामुळे पूर्वी जें नातं सात जन्मांपर्यंत टिकतं होत ते आता काही दिवसांनी तुटू लागले आहे.यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लगीनगाठ थोडीशी कमजोर झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण नेमकी घटस्फोट होण्यामागे कारणे काय आहेत याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. अवघ्या काही महिन्यांच्या काळात घटस्फोट घेणाऱ्यांना प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या धर्मपत्नी सुधा मूर्ती यांनी काय सल्ला दिला आहे याबाबत देखील जाणून घेणार आहोत.
घटस्फोट होण्याची कारणे खालील प्रमाणे
गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या भूमिकेत बदल झाला आहे. पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल या पुरत्याच मर्यादित होते. पूर्वी घरांच्या कामातच महिला गुंतलेली असे. मात्र हे 21 वे शतक येथे महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणे देखील आवश्यक आहे. परंतु यामुळे दोन विचारांची स्पर्धा होऊ लागली आहे. पती आणि पत्नी यांच्या विचारांमध्ये यामुळे स्पर्धा निर्माण होत आहे. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात तेढ निर्माण होत असल्याचे आढळले आहे. याशिवाय लग्नानंतर एक्स्ट्रा मेरीटल अफेअर्स ठेवणे हे देखील घटस्फोटामागे महत्त्वाचे कारण ठरले आहे.
तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आता पती आणि पत्नी दोघांना संवादासाठी वेळ मिळत नसल्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे. आपल्या व्यस्त शेड्युलमुळे आणि कामाच्या व्यापामुळे पती-पत्नींना कॉलिटी टाईम स्पेंड करण्यास वेळ मिळत नाहीये. परिणामी संवादाचा अभाव होतो आणि यामुळे शंका आशंका उत्पन्न होतात आणि साहजिकच हे देखील घटस्फोट होण्यामागे एक महत्त्वाचे कारण ठरू लागले आहे. याशिवाय, पत्नीला किंवा पत्नीला आपल्या मर्जीप्रमाणे बदलवण्यास भाग पाडणे, एकमेकांबद्दलचा आदर कमी होणे, पतीकडून किंवा पत्नीकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे यांसारखी कारणे देखील घटस्फोट होण्यामागे प्रमुख कारणे ठरत आहेत.
सुधा मूर्ती घटस्फोटावर काय बोलल्यात
देशातील प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या अर्धांगिनी सुधा मूर्ती यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत घटस्फोटाबाबत आणि पती-पत्नीच्या नातेसंबंधाबाबत एक अतिशय वाजवी आणि महत्त्वाची गोष्ट उल्लेखित केली होती. मूर्ती यांनी म्हटल्याप्रमाणे, जी लग्न पैशावर किंवा गरजांवर आधारित असतात अशी लग्न बंधने व्यवहार्य नसतात अर्थातच जास्त काळ टिकू शकत नाहीत. ते पुढे म्हणतात की, जर कोणाकडे भरपूर संपत्ती असेल तर तो अनेक वस्तू विकत घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याला आनंदाचे काही क्षण मिळतातही.
पण जर पैसा निघून गेला किंवा त्याच्यासाठी गरजेच्या असणा-या सुखवस्तू संपल्या तर आयुष्य त्या व्यक्तीसाठी बेचव होऊन बसणार आहे. मात्र, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम आहे आणि प्रेमाची भावना अग्रस्थानी ठेवून आहे असा व्यक्ती संसारिक जीवन आनंदाने जगू शकतो. म्हणजेच प्रेमाची भावना ज्या व्यक्तीसाठी महत्त्वाची आहे तो सगळ्यात भारी संसारिक जीवन जगू शकतो असे सुधा मूर्ती यांचे मत आहे. ते म्हणतात की प्रेमाची भावना सर्वतोपरी ठेवणाऱ्या व्यक्तीकडे पैसा असो किंवा कमी असो किंवा अजिबात नसो त्याचा आनंद कुठेही थांबत नाही.
तसेच त्यांनी सुखी संसारासाठी मुलाखतीत नवजोडप्यांना एक महत्त्वाचा कानमंत्र देखील दिला आहे. ते म्हणतात की, सुख असो वा दु:ख, गरीबी असो वा श्रीमंती नेहमी कोणत्याही परिस्थितीत आणि कुठल्याही सबबीविना एकमेकांचा आदर करा, एकमेकांवर प्रेम करा. कारण आलेली वेळ कधी न कधी निघून जाणारच आहे, पण केलेली कृती कधीच संपत नाही. निश्चितच मूर्ती यांचा हा सल्ला नवजोडप्यांसाठी प्रेरक ठरेल आणि भारतीय संस्कृतीत ज्याप्रमाणे पूर्वी सात जन्मांसाठी लग्न बंधनाची गाठ बांधली जात असे आणि ही गाठ सात जन्मापर्यंत टिकत असे तशीच नवीन पिढी पुन्हा आपल्या गौरवमयी भारतात विकसित होईल असा आशावाद व्यक्त करूयात.