Gautam Adani
Gautam Adani

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती $100 अब्ज डॉलर्स झाली आहे. यासोबतच ते जगातील 10वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

मालमत्तेत जोरदार वाढ –

ब्लूमबर्ग (Bloomberg) च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी $2.44 अब्जच्या निव्वळ संपत्तीत 10 व्या स्थानावर पोहोचले आहे. तसेच अदानी $ 100 बिलियनच्या निव्वळ संपत्तीसह सेंटबिलियनेअर्स क्लबमध्ये सामील झाले आहे.

100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंट अब्जाधीश म्हणतात. या वर्षात आत्तापर्यंत अदानीच्या एकूण संपत्तीत $23.5 अब्जने वाढ झाली आहे. या यादीतील सर्व लोकांपैकी अदानीच्या मालमत्तेत यावर्षी सर्वाधिक वाढ झाली आहे.

अंबानी 11 व्या स्थानावर आहेत –

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत. ते आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती (मुकेश अंबानी नेट वर्थ) $99 अब्ज एवढी आहे. या वर्षात आतापर्यंत अंबानींची संपत्ती $9.03 अब्जने वाढली आहे.

टेस्लाचे एलोन मस्क हे सर्वात श्रीमंत आहेत –

ब्लूमबर्गच्या यादीनुसार, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती $273 अब्ज इतकी आहे. यानंतर अॅमेझॉनचे जेफ बेझोस (Jeff Bezos) चे स्थान येते. त्यांची एकूण संपत्ती $188 अब्ज आहे.

10 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये याचाही समावेश आहे –

या यादीत LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) 148 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स १३३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे $१२७ अब्ज संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. याशिवाय टॉप 10 श्रीमंतांमध्ये लॅरी पेज (6), सर्जी ब्रिन (7), स्टीव्ह बाल्मर (8) आणि लॅरी एलिसन (9) यांचा समावेश आहे.