आनंदाची बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचे थकीत मानधन मिळणार, दिवाळी गोड होणार
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 6 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला होता. शिवाय, एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी प्राधिकरणाने 42,500 एवढा दिवाळी बोनस जाहीर केला होता.
एम एम आर डी ए चे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री महोदय आहेत. यामुळे या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आलेत.
एकीकडे राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात बोनसची भेट दिली जात आहे तर दुसरीकडे राज्यातील असेही काही कर्मचारी आहेत ज्यांना त्यांचे हक्काचे वेतनही वेळेवर मिळत नाहीये.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली होती. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा मोठा प्रश्न उपस्थित केला होता.
दरम्यान, या संबंधित कर्मचाऱ्यांना आता गेल्या तीन महिन्यांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना गेल्या तीन महिन्यांचे रखडलेले मानधन आजपासून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
आज जिल्ह्यातील अनेक पोलीस पाटील यांच्या खात्यात थकीत मानधनाची रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधितांच्या माध्यमातून यंदा दिवाळी गोड होणार असे बोलले जात आहे.
थकित मानधनाची रक्कम खात्यावर जमा झाली असल्याने संबंधितांनी शासनाचे आभार मानले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोलापूर जिल्ह्यात 900 पोलीस पाटील कार्यरत आहेत.
पण या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचे वेतन रखडलेले होते. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे लवकरात लवकर वेतन मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
विविध प्रसार माध्यमांमध्ये देखील शासनाच्या या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटीलांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती.
दरम्यान शासनाकडून या संबंधित कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामुळे आजपासून सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या खात्यात तीन महिन्यांची वेतनाची थकबाकी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.