5G Technology : (5G Technology) नुकतेच 5G सेवा सुरु झाली आहे. ही सेवा आपण आपल्या मोबाईल मध्ये सुरु करू शकतो. यासाठी ना मोबाईल बदल्यांची गरज आहे ना सिम कार्ड. काही सोप्या ट्रिक्सने आपण आपल्या फोनमध्ये ही सेवा सुरु करू शकतो. जाणून घ्या कसे ते.

या शहरांमध्ये 5G (5G) सेवा सुरू झाली

एअरटेलने (Airtel) सध्या दिल्ली, वाराणसी, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी येथे 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीने नेमके ठिकाण किंवा प्रदेश कुठे या सेवा उपलब्ध होतील हे सांगितलेले नाही.

तुमच्या स्मार्टफोनवर असे सुरूकरा 5G

तुमच्या स्मार्टफोनवर सेटिंग अॅप उघडा
कनेक्शनकडे जा किंवा मोबाइल नेटवर्क पर्याय पहा
नेटवर्क मोडवर टॅप करा आणि 5G/4G/3G/2G पर्याय निवडा
नेटवर्क मोड 5G वर सेट केल्यावर, तुम्ही 5G-सक्रिय क्षेत्रात असाल तर, स्मार्टफोन आपोआप 5G लोगो दाखवण्यास सुरुवात करेल.
यानंतर तुमचा सध्याचा स्मार्टफोन 5G सेवेत सुरू होईल

एअरटेलने पुष्टी केली आहे की फोन वापरकर्त्यांना 5G बद्दल माहिती असू शकते.
Airtel Thanks अॅप वापरून तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनसाठी 5G कंपॅटिबिलिटी तपासली जाऊ शकते.
तुम्ही 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागात राहिल्यास, तुम्ही चांगल्या स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.

सिम बदलण्याची गरज नाही

याशिवाय तुमच्या सध्याच्या 4G सिमवर 5G सेवा सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला सिम बदलण्याची गरज नाही.