मुंबई : मराठी नवं वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवसाने होते त्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात तसेच पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. सर्वत्र गुडी उभारून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी सर्वजण गुडी उभारून तसेच मराठमोळ्या पद्धतीने कपडे परिधान करुन नव वर्षाचे स्वागत करत आहेत. या दिवशी मराठी कलाकारही आपल्या चाहत्यांना नवं वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.
यातच मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही मराठमोळ्या अंदाजात गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून मराठी नवं वर्षाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूने यावेळी पारंपरिक कपडे परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच तिने पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुंदरतेने भुरळ पडणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते. सैराटमधील उत्तम अभिनयाच्या जोरावर रिकुने आपला स्वतः चा एका चाहता वर्ग निर्माण केला आहे. अलिकडेच रिंकू राजगुरू नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात दिसली होती. कधी चित्रपटाच्या माध्यमातून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीही रिंकूने मराठमोळ्या अंदाजतले काही फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.