मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. या घटस्फोटानंतर समांथाने आता नागा चैतन्यला सोशल मीडियावर अनफॉलो करत दोघांसंबंधीत सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. सामंथाच्या या निर्णयाने सर्वानाच धक्काच बसला आहे. हे होतेच का नाहीतर आता सामंथाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

समांथाने नागाचैतन्यसोबत शेअर केलेले सर्व फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावरुन हटवले आहेत. यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावर समांथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहे. त्यात ती म्हणाली, “कधीकधी तुमच्यातील शक्ती पाहण्यासाठी मोठ्या अग्नीची काहीही आवश्यकता नसते. काहीवेळा एक छोटीशी ठिणगीही यासाठी पुरेशी असते. ती फार शांततेत काम करते. तुम्ही हे चालू ठेवा, तुम्हाला हे समजले असेल.” यासोबत या पोस्टला तिने #MyMommaSaid हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. दरम्यान, समांथाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.