मुंबई : बॉलिवूडची ‘गंगू’ अभिनेत्री आलिया भट्ट आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आलियाला अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, आलियाच्या होणाऱ्या सासू म्हणजेच अभिनेत्री नितु कपूर यांनी आलियाला दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलियासोबतचा फोटो शेअर करत नितु यांनी ठीक 12 वाजता आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नितु कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्यांच्यासोबत आलिया दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन लिहित नितु यांनी आपल्या भावी सुनेला शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी लिहिले की, ‘आतून आणि बाहेरून सर्वात सुंदर असणाऱ्या आलिया भट्टला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’ नीतू यांच्या या सुंदर कॅप्शनने चाहत्यांची मन जिंकली आहेत.

दरम्यान, केवळ नीतू कपूर यांनीच नाही तर आलिया भट्टची ननंद रिद्धिमा कपूर साहनी हिनेही आलिया भट्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमाने आलियासोबतचा तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘हॅपी बर्थडे माय आलू…लव्ह यू सो मच’ असे रिद्धीमाने लिहिलेले आहे. यासोबतच रिद्धिमाने हार्ट इमोजीचाही वापर केला आहे.

आलीया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आलिया नुकतीच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात झळकली आहे. यानंतर ती आता एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती अयान मुखर्जीच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. एवढंच नव्हे तर आलीय ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटामधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.