Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; सोयाबीनचा भाव वधारला, प्रति क्विंटलला मिळतोय एवढा भाव

0

Soybean Rate : दिवाळीच्या पूर्वी सोयाबीन, कापूस समवेतचं विविध शेतमालाचे भाव दबावात होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार हा मोठा सवाल होता. पण त्यावेळी अनेक बाजार अभ्यासकांनी दिवाळीनंतर कापूस आणि सोयाबीन बाजारात थोडीशी सुधारणा होईल अशी अशा व्यक्त केली होती.

यानुसार आता शेतमालाच्या बाजारभावात हळूहळू सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजार अभ्यासकांचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे. मात्र सोयाबीन आणि कापूस दरात सुधारणा झाली असली तरी देखील शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव अजूनही बाजारात मिळत नाहीये.

परंतु दिवाळीच्यापूर्वी हमीभावाच्या आसपास विक्री होणारे सोयाबीन आता पाच हजार रुपयापेक्षा अधिक दरात विक्री होत आहे. वास्तविक गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला सात ते आठ हजाराचा भाव मिळाला होता.

यामुळे मागल्या वर्षी देखील चांगला भाव मिळेल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. पण गेल्यावर्षी पिवळं सोनं कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विकावं लागलं.

अपवाद वगळता जवळपास सर्वच शेतकऱ्यांना गेल्या हंगामात मोठे नुकसान सहन करावे लागले होते. यावर्षी मात्र कमी पाऊस झाला असल्याने उत्पादन घटणार आणि मालाला चांगला भाव मिळणार असे शेतकऱ्यांना वाटत होते.

पण यावर्षीच्या नवीन हंगामात अगदी सुरुवातीलाच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. आता हंगाम सुरू होऊन जवळपास एक ते दीड महिन्यांचा काळ उलटला आहे.

दरम्यान, हंगाम पुढे सरकल्यानंतर बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात सोयापेंड दरात आलेली तेजी आणि सोया तेल दरात झालेली सुधारणा यामुळे देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात सुधारणा होत असल्याचे तज्ञ लोकांनी सांगितले आहे.

आज देखील राज्यात सोयाबीनला चांगला समाधानकारक भाव मिळाला आहे. पण अजूनही सोयाबीन 6,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात विकला जात आहे.

परंतु बाजारभावात किंचित सुधारणा झाली असल्याने आगामी काळात आणखी भाव वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ?

आज वाशिम अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज सोयाबीनला ५४०० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच किमान 5050 आणि सरासरी 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा दर या मार्केटमध्ये नमूद करण्यात आला आहे.